मंगळवार, ३ डिसेंबर २०२४
3 December 2024

मुंबईत भाजप, शिंदे गटाचे ८ आमदार धोक्यात? उद्धव ठाकरेंचेही दोन आमदार ‘मायनस’मध्ये

 

मुंबई डायरी  / अतुल कुलकर्णी

 लोकसभेच्या निकालानंतर आता अवघ्या दोन ते तीन महिन्यांत येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे वेध महाराष्ट्राला लागले आहेत. मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा आहेत. त्यापैकी ३ विधानसभा मतदारसंघांत भाजपकडून महायुतीच्या उमेदवारांना कमी मताधिक्य मिळाले तर दोन विधानसभा मतदारसंघांतून अगदीच काठावर मताधिक्य मिळाले.

त्यामुळे भाजपच्या एकूण १६ पैकी ५ आमदारांच्या परफॉर्मन्सवर लोकसभेच्या निकालाने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ६ आमदार गेले. त्यापैकी ४ विधानसभा मतदारसंघांत शिंदे गटाचे आमदार ‘मायनस’मध्ये गेले आहेत. दुसरीकडे काँग्रेसच्या ४ पैकी ३ आमदारांनी चांगले मताधिक्य दिले आहे.

भाजपचे १६ आमदार आहेत. त्यापैकी ३ आमदारांच्या मतदारसंघांत लीड कमी झाला भारती लवेकर – २१,०९० राम कदम – १५,७७२ कॅप्टन तमिळ सेलवन – ९३१२  मुंबई भाजपचे अध्यक्ष वांद्रे पश्चिमचे आ. आशिष शेलार यांनी भाजपचे उज्ज्वल निकम यांना फक्त ३,६०६ मतांचा लीड दिला. तर अंधेरी पश्चिमचे आ. अमित साटम यांच्या मतदारसंघात केवळ २२१ मतांचा लीड आहे.

भाजपच्या ९ आमदारांना सध्या धोका नाही. कारण, त्यांच्या मतदारसंघांतून महायुतीच्या उमेदवारांना भरपूर मते मिळाली आहेत. सुनील राणे + १,००,७७५ योगेश सागर + ७९,०९६ अतुल भातखळकर +६९,९०५ मनीषा चौधरी +६२,२४७ मिहीर कोटेचा +६०,४४२ पराग अळवणी +५१,२२५ मंगल प्रभात लोढा +४९,२८७ पराग शहा +३३,६०९ विद्या ठाकूर +२३,७४२ या दोघांना भीती कालीदास कोळंबकर + १०,६२६ राहुल नार्वेकर + ९,७३२ यांनी इतक्याच मतांची लीड दिली आहे. शिंदे गटाच्या सहापैकी चार आमदारांचा लीड कमी झाला. यामिनी जाधव (-४६,०६६) मंगेश कुडाळकर (-२३,५६४) रवींद्र वायकर (-११,२९१) दिलीप लांडे (-४,३२४)

रवींद्र वायकर मुंबई उत्तर पश्चिममधून उमेदवार होते. ते स्वतःच त्यांच्या जोगेश्वरी पूर्व मधून ११,२९१ मतांनी ‘मायनस’ झाले.  दक्षिण मुंबई मतदारसंघातून यामिनी जाधव शिंदे गटाच्या लोकसभेच्या उमेदवार होत्या. त्या स्वतः भायखळा विधानसभेतून ४६,०६६ मतांनी ‘मायनस’ झाल्या. उद्धवसेनेचे ६ आमदार ‘प्लस’मध्ये असले तरी त्यांचा लीड भाजपच्या आमदारांइतका जास्तीचा नाही. अजय चौधरी +१६,९०३ संजय पोतनीस +१६,२९२ सुनील राऊत +१५,८६५ आदित्य ठाकरे +६,७१५ रमेश कोरगावकर +३,४५८ प्रकाश फातरपेकर +२,८७२ मुंबई काँग्रेसचे ४ आमदार आहेत. त्यात तिघांचा लीड चांगला आहे. अमिन पटेल +४०,७७९ वर्षा गायकवाड +३७,१५७ झिशान सिद्दिकी +२७,४६२ असलम शेख +८३५ उद्धवसेनेच्या आठपैकी दोन आमदारांचा लीड कमी झाला. ऋतुजा लटके (-१०,११८) सुनील प्रभू (-१,७०१)  शिवसेना काँग्रेसची मते एकमेकांना ट्रान्सफर झाली.  वर्षा गायकवाड यांच्या धारावी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे अनिल देसाई यांना ३७,१५७ मतांचा लीड दिला.

कलिना विधानसभेचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार संजय पोतनीस यांनी वर्षा गायकवाड यांना १६,२९२ मतांचा लीड दिला.  उद्धवसेनेची काँग्रेसला आणि काँग्रेसची उद्धव सेनेला मोठ्या प्रमाणावर मते ट्रान्सफर झाली.  नवाब मलिक यांच्या अणुशक्ती नगर मतदारसंघात +२९,०८३ मतांचा लीड अनिल देसाई यांना मिळाला.  सपाचे अबू आझमी यांच्या मतदारसंघातून संजय दिना पाटील यांना +८७,९७१ मतांचा लीड मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *