बँक म्हणते, त्याची चौकशी सुरू आहे…
औरंगाबाद, दि. ११ (लोकमत ब्युरो) – औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसंबंधी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बँकेने आपली बाजू मांडताना म्हटले आहे की, जिल्हा परिषद शाखेतील गैरव्यवहार अजून निर्णयाप्रत आलेला नाही. कोणी तरी द्वेषापोटी हे सारे करीत आहे. सदर शाखेत गैरव्यवहार झघल्याचे अजून तरी निष्पन्न झाले नाही. बँकेचे दक्षता पथक शाखेची संपूर्ण चौकशी करून दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई होईलच, असे बँकेचे कार्यकारी संचालक प्रताप चव्हाण यांनी सांगितले.
जिल्हा बँकेच्या १४५ शाखांतील सर्वोत्कृष्ट शाखा म्हणून जिल्हा परिषद शाखेचा उल्लेख होतो. मात्र, काही विघ्नसंतोषी मंडळी अफवा पसरवत आहेत, असे बँकेचे अध्यक्ष रामकृष्णबाबा पाटील यांनी कळविले आहे व जिल्हा परिषद शाखेला त्यांनी चांगल्या शाखेचे प्रमाणपत्र दिले आहे.
मात्र, ११ मार्चच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात उपस्थित केलेल्या १0१७ एण्ट्रीज संतुलित न करता ३१ मार्च २00२ पर्यंतचे लेखा परीक्षण कसे झाले, त्या १0१७ एण्ट्रीज जिल्हा बँकेच्या अन्य कोणत्या बँकेवर परिणाम करणाऱ्या आहेत, अशा शाखांचे देखील त्या एण्ट्रीज संतुलित न करता लेखा परीक्षण झाले का, लेखा परीक्षणात या गोष्टी लक्षात आल्या का, आल्या तर त्या कोठे नोंदविल्या आहेत का यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही.
Comments