बुधवार, २२ जानेवारी २०२५
22 January 2025
२६ : ११ ऑपरेशन मुंबई
  • भाषा:मराठी/गुजराती
  • लेखक:अतुल कुलकर्णी
  • वर्ग:युद्धविषयक
  • प्रकाशन:लोकवाङमय गृह
  • पृष्ठे:१४८
  • बाइंडिंग:पेपरबॅक

मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात ’26/11 ऑपरेशन मुंबई’ हे पुस्तक अतुल कुलकर्णी यांनी लिहीले. या घटनेनंतर अवघ्या तीन महिन्यात आलेले हे पहिले पुस्तक होते. लोकवामय प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले होते. या पुस्तकाचे प्रकाशन शहिद हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे, माजी गृहमंत्री आर.आर. पाटील, माजी गृहराज्यमंत्री राजेंद्र दर्डा, सुपरकॉप माजी पोलिस महासंचालक जे.एफ. रिबेरो यांच्या हस्ते झाले. या पुस्तकासाठी मिळालेले सगळे मानधन त्यावेळी अतुल कुलकर्णी यांनी श्रीमती कविता करकरे यांना दिले होते. या कार्यक्रमास विद्यमान केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्यासह विविध क्षेत्रतील अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर माजी अधिकारी अ‍ॅड. उदय बोपशेट्टी यांनी केले होते. हे पुस्तक गुजराती भाषेतही आले. त्याचा अनुवाद किशोर गौड यांनी केला आहे. त्याचे प्रकाशन अहमदाबाद येथे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्याहस्ते झाले होते. या पुस्तकाच्या त्यावेळी किमान सहा एडिशन निघाल्या. एनडीटीव्ही ने 26/11 च्या घटनेवर बनवलेल्या कार्यक्रमासाठी या पुस्तकाचे संदर्भ वापरले होते. शिवाय देशभरातील अनेक मान्यवर वर्तमानपत्रत ही यावर लिहून आले होते.