आमचं विद्यापीठ

- भाषा:मराठी
- लेखक:अतुल कुलकर्णी
- वर्ग:माहितीपर, लेख
- प्रकाशन:रेखा प्रकाशन
- पृष्ठे:१३४
- बाइंडिंग:पेपरबॅक
ज्येष्ठ पत्रकार, एडिटर इन चीफ, आणि सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्र समूहाचे मालक. गेली पंधरा वर्षे सक्रीय राजकारणात असल्यामुळे पत्रकारितेचा आणि त्यांचा तसा थेट संबंध नव्हता. त्यामुळे कदाचित नव्या पत्रकारांना राजेंद्र दर्डा हे केवळ राजकारणी, शिक्षणमंत्री, वृत्तपत्रचे मालक एवढीच माहिती असेल. मात्र पत्रकारितेची कोणतीही पदवी न घेतलेल्या अनेक तरुणांना त्यांनी पत्रकार म्हणून नावारुपाला आणले. जात, धर्माच्या पलिकडे जाऊन त्यांनी राज्यातल्या ग्रामीण भागातील पत्रकार राज्यपातळीवर आणले. त्यांची स्वत:ची अशी ओळख निर्माण करुन दिली. वृत्तपत्रीय व्यवहाराचं व्यवस्थापन हे व्यावसायिक गरजेपोटी, छपाई तंत्रज्ञानाबद्दल सतत अद्ययावत राहणं कुतुहलापोटी तर बातमी, लेखन आणि संपादन यागोष्टी आत्यंतिक आवडीपोटी त्यांनी केल्या. पत्रकारितेचा गंधही नसलेल्या आणि नोकरीसाठी म्हणून लोकमतमध्ये आलेल्यांचे ते केवळ संपादक झाले नाहीत तर प्रसंगी कठोर शिक्षक, प्रेमळ पिता आणि मनस्वी मार्गदर्शकही झाले. अतुल कुलकर्णी यांच्यासरख्या अनेकांचे ते चालते बोलते विद्यापीठ झाले.! त्यामुळे त्यांच्यावरील विविध मान्यवरांच्या लेखांचे संपादन करुन ‘आमचं विद्यापीठ’ हे पुस्तक अतुल कुलकर्णी यांनी लिहीले. या पुस्तकात दिनकर रायकर, कुमार केतकर, मधुकर भावे, व्यंकटेश केसरी, प्रशांत दळवी, अजय अंबेकर, चक्रधर दळवी, नंदकिशोर पाटील, श्रद्धा बेलसरे, राजा माने, विजय बाविस्कर, सुधीर महाजन, इम्तियाज जलील, सुजाता आनंदन, विलास तोकले, विवेक रानडे, लखीचंद जैन, मोहन राठोड या सगळ्यांचे लेख आहेत.