बिनचेह-याची माणसे
- भाषा:मराठी
- लेखक:अतुल कुलकर्णी
- वर्ग:भेट देण्यासाठी निवडक, अनुभव कथन, पत्रकारिता
- प्रकाशन:बुकगंगा पब्लिकेशन्स, स्पंदन पब्लिकेशन
- पृष्ठे:१२८
- बाइंडिंग:पेपरबॅक
पत्रकार म्हणून मुंबईत फिरताना मराठवाडय़ासारख्या प्रदेशातून आल्यामुळे असेल पण एक बुजरेपणा अतुल कुलकर्णी यांना होता. पण जेव्हा अवतीभवती पाहिले तेव्हा त्यांच्या लक्षात येऊ लागले की, फारशी माहिती नाही असे लोकही बिनधास्त वावरतात. तेव्हा आपण का नाही..? या प्रश्नाने त्यांना विचारास भाग पाडले. सुरुवातीला शहरं समजून घेण्यासाठी असो किंवा इथली माणसं.. ते तासन्तास भटकले. फिरण्याला दिशा नसायची. सीटीबसमध्ये बसायचे. शेवटचा स्टॉप सांगायचा. तेथे उतरून दुसरी बस करायची. लोकल नेईल तिथे जायचे. पहात रहायचे. अनोळखी असला तरी त्याच्याशी गप्पा मारायच्या. जे पाहिलं ते तसे बातमीचे विषयही नव्हते. पण जे पाहिले, अनुभवले, ते तसे रोजच्या जगण्यातले चालते बोलते अनुभव होते. हे कुठेतरी मांडले पाहिजे, लिहीले पाहिजे असे सतत वाटत रहायचे. त्यातून ‘बिनचेह:याची माणसं’ या पुस्तकाचा जन्म झाला. या पुस्तकात त्यांनी चेहरे नसलेल्या माणसांचे शब्दचित्र मांडण्याचा प्रयत्न केलाय. यातील सगळी पात्रे खरी आहेत. घडलेल्या सगळ्या घटना ख:या आहेत. फक्त त्याला व्यक्तिगत स्वरूप येऊ नये म्हणून त्यांची नावे टाकलेली नाहीत. मात्र यातील अनुभव कोणाच्याही बाबतीत खरे होतील असे आहेत.
या लेखांवर ज्येष्ठ चित्रकार प्रकाश बाळ जोशी यांनी चित्रे काढली आहेत तर कॅलिग्राफीतील बादशाह अच्युत पालव यांनी कॅलिग्राफीपासून मांडणीर्पयत स्वत:चा सहभाग दिला आहे. लेख, चित्रे आणि कॅलिग्राफी यांचे एकत्रित पुस्तक हा असा देशातला पहिला प्रयोग आहे.
या पुस्तकाच्या आजर्पयत सहा आवृत्त्या आल्या आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन 7 मे 2018 रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, लोकमत मिडीयाचे चेअरमन विजय दर्डा, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, माजी सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या उपस्थितीत झाली.