नव्या वर्षात ३३ आयएएस, आयपीएस अधिकारी घरी जाणार
नव्या वर्षात मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकही नवे येणार
मुंबई दि. ३१ – निवृत्ती हा तसा शासकीय सेवेत नित्याचा भाग. मात्र नव्या वर्षात कधी नव्हे ते १८ आएएएस अधिकारी आणि १५ आयपीएस अधिकारी निवृत्त होणार आहेत. त्यात राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड आणि पोलिस महासंचालक के. सुब्रमण्यम यांचाही समावेश आहे. यातील किती अधिकारी आपले ‘वजन’ वापरुन सरकार अंबर दिवा टिकवून ठेवण्यात यश मिळवतात हे ही नवे वर्ष दाखवून देणार आहे!
जे.पी.डांगे यांना मुख्यसचिव पदावरुन अचानक हटवून हे पद ज्यांना मिळाले ते रत्नाकर गायकवाड ३१ मे रोजी निवृत्त होतील. त्यांना तीन महिन्याची मुदतवाढ मिळावी असे प्रयत्न चालू असले तरी एका गटाने त्यास आतापासूनच विरोध सुरु केला आहे. तर मुंबई महापालिकेचे बहुचर्चित आयुक्त सुबोधकुमार आणि सामान्य प्रशासन विभागाचे सचिव नंदकुमार जंत्रे हे नव्या वर्षातील निवृत्तांच्या टीमचे ओपनिंग बॅट्समन ठरले आहेत. ते ३१ जानेवारी रोजी निवृत्त होणार आहेत. मुंबईच्या डीसी रुलमध्ये दुरगामी परिणाम करणारे बदल सुबोधकुमार यांनी केले पण अद्याप त्यावर सरकारने माहोर उमटवलेली नाही. मनपा निवडणुका समोर असल्याने त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर फाईलींचा प्रवास संगणकमार्गे करण्याचे काम जंत्रे यांनी केले आहे. २९ फेब्रुवारी रोजी गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव उमेशचंद्र सरंगी आणि इ. झेड. खोब्रागडे हे दोघे निवृत्त होतील. अत्यंत अभ्यासू अधिकारी अशी ख्याती असलेल्या सरंगी यांनी नाबार्डमध्ये उल्लेखनीय काम केले आहे. एप्रिल मध्ये डी.एस. झगडे, तर मे मध्ये रत्नाकर गायकवाड यांच्यासह सुधीर ठाकरेही निवृत्त होत आहेत. ग्रामविकास विभागाचे ते सचिव आहेत. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून ते मंत्रालयात परिचीत आहेत. जून महिन्यात अॅना दाणी, यु.एस. राठोड, एस.जे. कोचे हे निवृत्त होत आहेत. नाशिक महापालिका आयुक्तपदाच्या बदलीवरुन सरकारच्या विरोधात कॅट मध्ये जाणारे व जिंकून येणारे भास्कर सानप देखील जूनमध्येच निवृत्त होत आहेत. शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या अत्यंत विश्वासाचे व सहकार क्षेत्रात वेगळी छाप पाडणारे राजीव अग्रवाल हे प्रतिनियुक्तीवर दिल्लीत आहेत. ते ऑगस्ट मध्ये निवृत्त होतील. त्याचवेळी एस.एन. कारले देखील निवृत्त होत आहेत. ऑक्टोबर मध्ये जे.एस. सहानी व एस. ओ. सोनवणे आणि डिसेंबरमध्ये चांद गोयल निवृत्त होतील. शिवाय अनेक वर्षात केंद्रातील उर्जा खात्यात प्रतिनियुक्तीवर असलेले व अभ्यासू अधिकारी अशी ओळख असणारे गिरीष प्रधानही डिसेंबरमध्ये निवृत्त होतील.
१५ अधिकाऱ्यांना या वर्षात सॅल्यूॅट!
जे.पी.डांगे यांना मुख्यसचिव पदावरुन अचानक हटवून हे पद ज्यांना मिळाले ते रत्नाकर गायकवाड ३१ मे रोजी निवृत्त होतील. त्यांना तीन महिन्याची मुदतवाढ मि १५ अधिकाऱ्यांना या वर्षात सॅल्यूॅट! राज्याचे पोलिस महासंचालक के. सुब्रमण्यम् हे शांत व निस्पृह असे अधिकारी म्हणून ओळखले जातात. ते ३१ जुलै रोजी दलाकडून शेवटचा सॅल्यूट घेतील. तर डीजी के. बी. गोकूळचंद्र ऑक्टोबरमध्ये. राज्यातील पाच अप्पर पोलिस महासंचालक देखील याच वर्षात अखेरचा सॅल्यूट घेतील. त्यात जानेवारीत लोहमार्गचे एस.बी. सावरकर, फेब्रुवारीत जेल विभागाचे उध्दव कांबळे, एप्रिलमध्ये सीआयडीचे अशोक धिवरे, ऑक्टोबरमध्ये एसीबीचे रामराव वाघ आणि नोव्हेंबरमध्ये नागपूरचे पोलिस आयुक्त अंकूश धनविजय यांचा समावेश आहे. वाघ हे मनमिळावू व शांत स्वभावाचे तसेच अधिकाऱ्यांमध्ये लोकप्रिय असे व्यक्तीमत्व आहे. तर उध्दव कांबळे हे चांगले गायक आहेत शिवाय औरंगाबादला त्यांनी केलेले चांगले काम अजूनही लोकांच्या लक्षात आहे.
याचवर्षात चार विशेष पोलिस महासंचालक निवृत्त होत आहेत. ज्यात सीआयडीचे माधव कर्वे मार्चमध्ये, वजन मापे चे डॉ. माधव सानप जूनमध्ये, अमरावतीला असणारे मोहन राठोड जूनमध्ये निवृत्त होत आहेत. चौथे जवाहरसिंग डिसेंबर १२ मध्ये निवृत्त होत असले तरी ते याआधीच निलंबीत झाले आहेत.
पुण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त चंद्रकांत कुंभार हे वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे ३१ जानेवारीला निवृत्त होतील. तर पोलिस उपमहानिरिक्षक डी.जी. श्रीराव हे डिसेंबरमध्ये निवृत्त होतील. शिवाय पुणे एसआरपीचे एस.डी. त्रिंबके हे मे महिन्यात आणि वायरलेस पुण्याचे एसपी कार्ल डिसोजा हे ३१ डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत.
राज्यात मोठ्या प्रमाणावर आयएएस अधिकाऱ्यांची गरज असताना दुसरीकडे काही अधिकाऱ्यांच्या कामाचे मुल्यमापनच होत नसल्याची तक्रारही अधिकाऱ्यांमध्येच आहे. सध्या ज्या गतीने प्रशासन चालू आहे त्याच गतीने ते चालू राहीले तर पुढच्यावर्षी देखील अशी एखादी यादी छापण्याशिवाय वेगळे काही हाती लागेल असे चित्र आजतरी दिसत नाही.
Comments