रविवार, २२ डिसेंबर २०२४
22 December 2024

आता मुंबईत क्रिस्पर कॅस तंत्रज्ञानाने होणार कोरोना तपासणी
आयसीएमआर व एनएबीएल मान्यता मिळणारी देशाची पहिली लॅब

अतुल कुलकर्णी
लोकमत / शुभवर्तमान
मुंबई : कोरोनाची तपासणी करण्याकरिता आता टाटा समूह आता क्रिस्पर कॅस तंत्रज्ञान आणले आहे. याच्या सहाय्याने रुग्णांचा स्वॅब जास्त अचूकतेने व गतीने मिळणार आहे. यासाठी आयसीएमआर आणि एनएबीएल यांनी मुंबईतील या लॅबला मान्यता दिली आहे. उद्यापासून याच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुण्यामध्ये ही मोबाईल लॅब सुरू होत आहे. ही लॅब आता टाटा उद्योग समुहाबरोबर वैद्यकिय क्षेत्रातील क्रिस्पर कॅस तंत्रज्ञानातील सामंजस्य करारातील एक महत्वाचा टप्पा पुर्ण करणारी भारतातली पहिली लॅब ठरली आहे.

क्रिस्पर कॅस तंत्रज्ञान (क्लस्टरली रेग्युलरली इंटरस्पेस शॉर्ट प्लॅंट्रोमिक रिपीट / Clustered Regularly Interspaced Short Palindromic Repeats and CRISPR-associated – Cas) वैद्यकिय क्षेत्रातील मैलाचा दगड ठरणार असून सदर तंत्रज्ञानानुसार कोरोनाचे निदान अचुक व कमी वेळात होणार आहे. सदर तंत्रज्ञानामुळे कोविड -१९ मधील कोरोनाबाबत निदान करण्याची अचूकता आता कित्येक पटीने वाढणार असुन ॲन्टिजेन टेस्टींग व आरटी-पीसीआर तपासणीपेक्षा सदर तंत्रज्ञानाने होणारी तपासणी कित्येक पटीने अचुक राहणार आहे. हे तंत्रज्ञान ‘टाटा एमडी चेक’ यांनी विकसीत केले असून त्यांचा वापर करणारी दादरची पॅनाशिया केअर डायग्नोस्टिक ही भारतातील पहिली लॅब ठरली आहे. याची माहिती देताना या लॅबचे प्रमुख डॉ. विक्रांत सनगर म्हणाले, या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्वॅब घेतल्यापासून दोन ते तीन तासात रिपोर्ट येतो. शिवाय रोज कमीत कमी ५०० ते २००० तपासण्या एका लॅबमध्ये २४ तासात होतात. स्वॅब घेणाऱ्यांकडे मोबाईल वर एक ॲप तयार करून दिले आहे. त्यात त्याची माहिती भरल्यानंतर ज्यावेळी रिपोर्ट तयार होतो तेव्हा तो रुग्णाच्या मेलवर किंवा मोबाईलवर आणि आयसीएमआर च्या पोर्टलवर एकाच वेळी जातो. त्यामुळे यात मोठा वेळ वाचणार आहे. शिवाय या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने युके, साउथ आफ्रिकन, ब्राझिलियन व्हेरीयंट देखील सहजपणे तपासता येणार आहेत. सध्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे कोरोना चाचणीचा अहवाल मिळण्यासाठी दोन ते अडीच दिवस लागत आहेत. तेवढा काळ रुग्ण इतरत्र फिरत राहतो. साथ वाढवत जातो. या नव्या तंत्रज्ञानामुळे चार तासात रिपोर्ट हातात पडणार असल्यामुळे रुग्ण वाढीवर देखील आपोआप बंधने येतील, असे डॉ. सनगर म्हणाले.

आरटीपीसीआर तपासणी करताना रुग्ण पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे शोधण्यासाठी जो स्कोअर देण्यात येतो तसाच तो येथे ही देण्यात आला आहे. १० पेक्षा खाली स्कोअर आला तर रुग्ण निगेटिव्ह असेल. १० ते २० च्या मध्ये आला तर तो काठावर पॉझिटिव्ह असेल, आणि २० च्या वरती आला तर तो पूर्णपणे पॉझिटिव्ह असेल असा अर्थ या चाचणीतून निघेल. यासाठीची लॅब दादरमध्ये पॅनाशिया केअर डायग्नोस्टिक्स येथे सुरू झाली आहे उद्यापासून पुण्यामध्ये याच तंत्रज्ञानाने मोबाईल लाभही कार्यान्वित होईल टाटाने यासंबंधीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे, व या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनलेली ही पहिली लॅब आहे. या लॅबला नुकताच केंद्र शासनाच्या गुणवत्ता प्रमाण संस्थेने एनएबीएलने अधिकृत दर्जा दिला असून भारतीय आयर्विज्ञान अनुसंधान परिषदेनेही मान्यता दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *